मुंबई : सन 2013 या वर्षाकरिताराज्य शासनाचा भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. जसराज यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
हरयाणामध्ये जन्मलेल्या पं. जसराज यांनी सर्वप्रथम तबला वादनाचे व त्यानंतर मेवाती घराण्याच्या गायकीचे प्राथमिक धडे त्यांच्या वडिलांकडून घेतले. नंतर त्यांचे थोरले भाऊ, मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंग वाघेला आणि उस्ताद गुलाम कादरखान यांच्याकडून त्यांनी गायकीतील बारकावे आत्मसात केले. तसेच आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडूनही त्यांनी गायनाचे शिक्षण घेतले. अतिशय सुमधुर, लालित्यपूर्ण व सुरेल गायकी हे त्यांचे वैशिष्ट्य. या वैशिष्ट्यांमुळे लवकरच ते भारतीय शास्त्रीय संगीतातील एक ताकदीचे गायक म्हणून नावारुपाला आले. भारतीय शास्त्रीय संगीतातील गुरु -शिष्य परंपरा जोपासत त्यांनी देश-विदेशात अनेक शिष्य घडविले. पं. जसराज यांनी गायिलेले भक्ती संगीतही अतिशय लोकप्रिय झाले. ‘जसरंगी जुगलबंदी’ ही स्त्री व पुरुष गायक कलाकारांची जुगलबंदी गायनाची शैली त्यांनी विकसित करुन नावारुपाला आणली. त्यांच्या मेवाती घराण्याची परंपरा ते त्यांच्या शिष्यांच्या साथीने पुढे नेत आहेत. संगीत ही ईश्वराची सेवा आहे, असे मानून संगीत साधना करणारे पं. जसराज शास्त्रीय संगीतातील एक अतिशय ऋजु व ऋषितुल्य व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
पं. जसराज यांना पद्मविभूषण पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.
पं. जसराज यांच्यासारखे गानतपस्वी लाभले, हे राज्याचे भाग्य असून त्यांच्या प्रदीर्घ आणि अमूल्य अशा गानसेवेबद्दल शासनाच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांचा गौरव करताना शासनाला अत्यंत आनंद होत आहे. पं. जसराज यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना दीर्घायुरारोग्य लाभावे अशी शुभेच्छा देतो, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री सजंय देवतळे यांनी पं. जसराज यांचे अभिनंदन केले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून पहिला पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना प्रदान करण्यात आला आहे.