मुंबई :- जागतिक बाजारात रुपयाचे अवमूलन झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७० पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ केली. ही दरवाढ बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
    यापूर्वी १४ जुलै रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया ५५ पैशांनी वाढ झाली. जून महिन्यानंतर ही पाचवी पेट्रोल भाववाढ आहे. तर या वर्षातील डिझेलच्या किमतीमधील ही सातवी दरवाढ आहे. या दरवाढीमध्ये व्हॅट किंवा अन्य स्थानिक कराचा समावेश नाही.
 
Top