बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच शासनाच्यावतीने राबविण्यात येणा-या जलसंधारण पॅटर्नमधील भौगोलिक परिस्थितीतील त्रुती दुर करुन बनविण्यात आलेल्या आर.एस.एम. जलसंधारण पॅटर्नच्या माहितीचा छायाचित्रांसह स्लाईड शोचे प्रदर्शन व त्याची सविस्तर माहिती अकोला येथील विभागीय कार्यशाळेत तज्ञांसमोर सादरीकरण करण्यात आली.
कृषी विदयापीठ व विभागीय प्रकल्प संचालनाय, हैदराबाद यांच्या संयुक्त विदयमाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ अकोला येथे दि. 29 ते 31 जुलै दरम्यान तीन दिवशी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
इंग्रजी भाषेतील या परिषदेसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील उपमहासंचालक कृषी विस्तार डॉ. किरण कोकाटे, कार्यशाळेचे उदघाटक अध्यक्ष कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी, खासदार संजय धोत्रे, हैदराबाद येथील विभागीय प्रकल्प संचालक डॉ. एन. सुधाकर, डॉ.व्ही.एम. भाले, संचालक डॉ. के.व्ही. देशमुख, डॉ.व्ही.के. माहूरकर यांच्यासह आंध्रप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील कृषी विदयापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण व सर्व 78 कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.
यावेळी अभियंता असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी स्वत: इंग्रजी माध्यमातून या प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. शासनाच्यावतीने राबविण्यात येणा-या शिरपूर पॅटर्नसारख्या जलसंधारण पॅटर्नमध्ये काही दिवसांनी बंधा-याजवळ साठवणा-या गाळामुळे पाणी वरुन वाहण्याचा सुरुवात होते. सदरचा पाण्याचा प्रवाह जमिनीवरुन वाहताना शेजारी असलेल्या शेतांतून जाताना शेतक-यांच्या जमीनी वाहून जातात. त्यामुळे सदरचे बंधारे शेतकरी फोडतात. यामुळे शासनाचे कोटयावधी रुपये वाया गेले आहेत. सदरच्या प्रकल्पाचा अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये आढळलेल्या त्रुटी वरील उपाययोजना तसेच जमीनीत झिकझॅक पध्दतीने बोअर घेऊन वरील भागात विशिष्ट पध्दतीने जमीनी सोडण्यात येणारे पाणी, त्याचा परिणाम, कालावधी, उलटा उतार पध्दती, रिचार्ज वॉटर, डिप लेव्हल, दगडांचे पिचींग, भौगोलिक रचनेचा अभ्यास करुन बनविण्यात आलेल्या आर.एस.एम. जलसंधारण पॅटर्नच्या माहितीचा छायाचित्रांसह स्लाईड शो प्रदर्शित करण्यात आला.
सदरच्या पॅटर्नची माहिती प्रदर्शन केल्यानंतर तज्ञांचे एक पथक प्रायोगिक तत्वावरल राबविण्यात आलेल्या देवळाली येथील पॅटर्नला भेट देऊन संशोधन करतील, असे आश्वासन विभागीय कार्यशाळेत देण्यात आले. यावेळी सदरचा पॅटर्न राबविणारे अभियंता राजेंद्र मिरगणे व समन्वयक नानासाहेब दम यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विभागाच्या माहिती पुस्तिका, संशोधन प्रकल्प, वेबसाईट, कॅलेंडर्स इत्यादीचे प्रकाशन करण्यात आले.