उस्मानाबाद :- जिल्ह्यातील दहावी,बारावी व आयटीआय उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी उस्मानाबाद येथे सोमवार, दि.19 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सकाळी 10-30 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला असून यात पुणे, नाशिक, सातारा, औरंगाबाद आदि जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रातील उद्योजक / कंपनींचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यात  इच्छुक उमेदवारांची  मुलाखत घेवून निवड करण्यात  येणार आहे. या मेळाव्यात जवळपास चारशे पदांसाठी भरती करण्यात येणार आहे, असे सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानबाद यांनी कळविले आहे.
           रोजगार मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील  पात्र इच्छुक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी  त्यांचे शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आदिचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, स्वत:चा बायोडाटा, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नाव नोंदणी केलेल्या कार्डासह 19 ऑगस्ट रोजी स्वखर्चाने उस्मानाबाद येथे मुलाखतीस हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
        डेक्कन मॅनेजमेंट कन्सलन्टन्स,फिनीशिंग स्कुल,इंद्रावणे पुणेअंतर्गत्‍इंन्डो शोटलिस्ट लि. पीरनगुट,पुणे  जॉब ट्रेनीची 40 पदे असून एस.एस.एस.किंवा एच.एस.सी किंवा एच.एस सी, एमसीव्हीही ही शैक्षणिक पात्रता राहील. कल्याणी फोर्ज लि.कोरेगांव भिमा,ता.शिरुर, जि.पुणे येथे जॉब ट्रेनीची 100 पदे असून एस. एस. सी. किंवा एच.एस.सी किंवा एच.एस सी, एमसीव्हीही ही शैक्षणिक पात्रता राहील. महिंद्रा कनर्व्हर्स लि. पिरंगुट, पुणे येथे जॉब ट्रेनिची 40 पदे असून या पदासाठी शैक्षणिक अर्हता आयटीआय फीटर, टर्नर, वेल्डर, मशिनिष्ट, मेकॅानिक, शिट मेटल वर्कर, इलेक्ट्रीशियन, ग्राईंन्डर या पदासाठी 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
          एमपीट्रेनिंग ॲकडमी लि. एमटीई सोसायटीज, इंद्रावणे, पुणे अंतर्गत तापटीया लि. नाशिक येथे ट्रेनीसाठी 80 पदे असून एस. एस. सी. किंवा एच. एस. सी, आयटीआयतील कोणताही ट्रेड उत्तीर्ण असावा. अलिकॉन लि. पुणे येथे ट्रेनिची 50 पदे असून एस. एस. एस. किंवा एच.एस.सी उत्तीर्ण 18 ते 26 वयोगटातील उमेदवारांना येथे संधी आहे. मदरसन सुमी सिस्टीम लि. पुणे येथे ट्रेनिची 50 पदे असून तेथे फक्त  महिलांची  निवड केली जाणार आहे. एस.एस.सी./  एच.एस.सी किंवा आयटीआय कोणताही ट्रेड उत्तीर्ण व 18 ते 24 वयोगटातील महिला उमेदवारांना ही संधी आहे. बेक‍र्ट मुकंद वायर इंडस्ट्रीज प्रा. लि. लोणंद,ता. खंडाळा,जि. सातारा येथे ईपीपी ट्रेनी पदासाठी किमान 60 टक्के गुण  घेवून एस एस सी उत्तीर्ण आणि बी एस सी उत्तीर्ण तसेच  आयटीआय  इलेक्ट्रीशियन, फिटर, टर्नर, ग्रांईंन्डर, वेल्डर ट्रेड उत्तीर्ण असणाऱ्यांनाही संधी आहे. धुत ट्रॉन्समिशन प्रा. लि. एमआयडीसी शेंद्रा, औरंगाबाद येथे ईपीपी  ट्रेनी  50 पदांसाठी  फक्त महिला उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे. यासाठी एसएससी / एचएससी किंवा आयटीआय कोणताही ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
             जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.     
 
Top