उस्मानाबाद :- सन 2013-2014 या शैक्षणिक वर्षात गुणवत्ता पात्रता धारण करणाऱ्या माजी सैनिकांच्या / माजी सैनिक / विधवा/ युध्द विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीसाठीचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश उशिरा झाल्यास प्रवेश दिनांकापासून एक महिन्यच्या आत अर्ज स्वीकारले पाठवावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
शालांत परीक्षा 10 वी किमान 60 टक्के गुणाने उत्तीर्ण होवून इयत्ता 11 वी ,इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व पाल्यांना गुणवत्तेनुसार पहिल्या 15 पाल्यांना प्रतिवर्ष एक हजार, त्यानंतरच्या 16 ते 30 पाल्यांना 60 गुण घेवून अभियांत्रिकी किंवा तत्सम पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व पाल्यांना प्रतिवर्षी रुपये 1 हजार पाचशे रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
उच्च माध्यमिक परीक्षा इयत्ता 12 मध्ये किमान 60 टक्के गुणाने उत्तीर्ण होवून वैद्यकिय / अभियांत्रिकी, वास्तूशास्त्र, औषध निर्माण, हॉटेल मॅनेजमेंट व तत्सम पदवी /आयुर्वेदीक/ होमीयोपॅथीक/ युनानी या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या सर्व पाल्यांना प्रतिवर्षी 4 हजार व कला, वाणिज्य, विज्ञान,अध्यापक विद्यालय, अध्यापक महाविद्यालय, विधी, पदविका व इतर तांत्रिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षीर्1 हजार पाचशे रुपये शिष्यवृती मिळते.
पदव्युत्तर अभ्यासक्रमानुसार पदवी परीक्षेमध्ये 60 टक्के गुण मिळवून पुढील शिक्षण घेणाऱ्या सर्व पाल्यांना प्रतिवर्ष 4 हजार याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्यापीठाने मान्य केलेल्या विषयात संशोधनपर अभ्यासक्रम करणाऱ्या पी. एच. डी./ तत्सम प्रत्येक जिल्हयातील माजी सैनिकांच्या 10 पाल्यांना पहिल्या दोन वर्षासाठी प्रतिवर्षी रुपये 7 हजार प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. ( या सदराखाली अवलंबीतांच्या व्याखेमधील 25 वर्षे वयाची अट शिथिल करुन ती 32 वर्षापर्यंत करण्यात आली आहे). 12वी मध्ये 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून पुढे परराज्यात व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना पदवी / पदवीव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी रुपये 4 हजार व पदवीकासाठी प्रतिवर्षी 1 हजार 500 रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी पुढीलप्रमाणे कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे.

लाभार्थींचा अर्ज, विहीत नमुन्यातील सर्व माहितीसह फॉर्म जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध आहे, ओळखपत्राची छायांकित प्रत, पाल्य शिक्षण घेत असलेल्या वर्षाचे बोनाफाईड सर्टीफिकेट, मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकेची प्रमाणीत केलेली छायांकित सत्यप्रत प्रत, पाल्य मुलगी असेल व 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर सरपंच, ग्रामसेवक, नगरसेवक यांचेकडून अविवाहीत असलेले प्रमाणपत्र, पाल्य शिक्षण घेत असलेल्या शाळा, कॉलेज, संस्थेकडून शिष्यवृत्ती देत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, डिसचार्ज बुकातील सैन्य सेवाविषयी माहिती असलेलल्या पहिली तीन पाने व कुटुंबाची माहिती असलेल्या पानाची छायांकित प्रत, गॅप असेल तर गॅपप्रमाणपत्र, पंतप्रधान शिष्यवृत्ती मिळत नसल्याबाबततचा लाभार्थ्यांचा दाखला सादर करुन या योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.