उस्मानाबाद :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा सप्टेंबर/ऑक्टोबर 2013 पुनर्परीक्षार्थी परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे डेटा अपलोड करण्यास कनिष्ठ महाविद्यालयास अडचणी येत असल्याने याकरीता पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांची आवेदनपत्रे ऑफलाईनमध्ये भरुन ठेवले आहे किंवा पाठवयाचे बाकी असेल, असे सर्व ऑफलाईनमध्ये भरुन त्यांनी त्यांच्या झीप फाइल्स आणि टेक्स्ट फाईल divboard8@gmail.com ई-मेलव्दारे ॲटच करुन पाठविण्याचे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे सचिवानी केले आहे.
मंडळ स्तरावर हा ई-मेल व्दारा प्राप्त डेटा अपलोड करुन घेण्यात येणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या बँकेचे चलन अपलोड करण्यास अडचण आल्यास त्यांनी ते प्रिलिस्ट सोबत विभागीय मंडळात जमा करावे. त्याचप्रमाणे एम. सी. व्ही. सी. ची आवेदनपत्रे ऑनलाईन भरली नसल्यास जुनीच छापील आवेदनपत्रे भरुन मंडळ कार्यालयात जमा करण्यात यावे.असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,लातूर यांनी कळविले आहे.