उस्मानाबाद : जिल्ह्यात सोयाबीन, कापूस किडरोग सर्वेक्षणात सोयाबिन पिकावर काही ठिकाणी ऊंट अळी, घाटे अळी व तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. कापूस पिकावर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
सोयाबीन वरील उंट अळी, तंबाखुवरील पाने खाणारी अळी व घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी.0.4 ग्राम प्रती लिटर पाण्यातून फवारावे. तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या अंडी पुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा, पाण्याचा निचरा करावा व पिक तणमुक्त ठेवावे.
कापूस पिकावरील रससोशक कीडीसाठी फिप्रोनिल 5 एस जी.2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. इमीडाक्लोप्रियडची वारंवार फवारणी करु नये. स्पोटोप्टेरा तंबाखुवरील पाने खाणारी अळीच्या अंडीपुंज व समुहातील अळयावर लक्ष ठेवावे. सदरील किटक नाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी किटक नाशकांची मात्रा 3 पट करावी. असे आवाहनही करण्यात आले आहे.