उस्मानाबाद -: जिल्ह्यातील दहावी,बारावी व आयटीआय उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांसाठी उस्मानाबाद येथे सोमवार, दि. 19 ऑगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे सकाळी 10-30 वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला असून यात पुणे, नाशिक, सातारा, औरंगाबाद आदि जिल्ह्यातील खाजगी क्षेत्रातील उद्योजक / कंपनींचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यात इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेवून निवड करण्यात येणार आहे. या मेळाव्यात जवळपास चारशे पदांसाठी भरती करण्यात येणार आहे, असे सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानबाद यांनी कळविले आहे.
रोजगार मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील पात्र इच्छुक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आदिचे मुळ प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, स्वत:चा बायोडाटा, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे नाव नोंदणी केलेल्या कार्डासह 19 ऑगस्ट रोजी स्वखर्चाने उस्मानाबाद येथे मुलाखतीस हजर राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.