उस्मानाबाद -: जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिक्षण मंडळाने घेतल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिली आहे.
जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्यांची बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी उपाध्यक्ष दुधगावकर यांच्या कक्षात बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष दुधगावकर यांनी जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 9 वी व 10 वी मधील सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याबाबत सुचविले. त्यानुसार शिक्षण मंडळाने फी माफ करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच गतवर्षी झालेल्या द्वितीय सत्र परीक्षेच्या छपाईचा खर्च केल्याबद्दल प्राथमिक शिक्षक संघाचे बाळकृष्ण तांबारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी एन. आर. जगदाळे, गटशिक्षणाधिकारी सी. एस. गाढवे (कळंब), एस. ए. सय्यद, एस. एम. राऊत, बी. के. यमुनवाड, एम. बी. भोसले, बी. एस. पाटील, व्ही. जी. पाटील, लालासाहेब मगर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.