उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील दुष्काळीसदृष्य परिस्थितीवरील उपाय योजना व केलेली कामे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदयस्थितीत जिल्ह्यात पाऊसाचे प्रमाण कमी आहे, जो पाऊस झाला आहे त्याचे पाणी अडवून साठवण करण्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली तर त्यांचेवर कडक कार्यवाही केली जाईल व पावसाचे पाणी साठवणी संबंधी जी कामे चालू आहेत ते तात्काळ पूर्ण् करुन अहवाल सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
           सध्या ज्या तलावात पाणी साठवण झाली आहे व त्यात गळती वाढली आहे ती तात्काळ बंद करुन घ्यावी तसेच छतावरील पणी साठवणूक करण्याचे अपुर्ण कामे पुर्ण् करुन घ्यावीत सदर कामाबाबत निवीदा प्रचलित नियमावलीनुसार मागवून त्यास मान्यता घेवून दर्जेदार कामे करावीत, असेही सांगितले.
           याप्रसंगी विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता पापडकर, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. तांगडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. कोटेचा, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याध्याधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.                   
 
Top