नळदुर्ग -: ग्रामीण भागातील सुशिक्षितासह अशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम उपलब्ध करुन दिले, त्याचबरोबर दुग्ध उत्पादकांना योग्य दर देऊन वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीने अतिशय चांगल्या दर्जाचे दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करीत आहे. असे गौरवोदगार पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी बाभळगाव (ता. तुळजापूर) येथील वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीच्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित दुध भुकटी प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी काढले.
            रविवार दि. 25 ऑगस्ट रोजी वैष्णोदेवी फुड प्रॉडक्ट कंपनीच्या सातव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित वीस टन दुध भुकटी प्रकल्पाचे उदघाटन पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर रक्तदान शिबीराचे उदघाटन ना. चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.  या प्रकल्पावर 4 लाख लीटर दुधापासून 20 टन दुध भुकटी व दुग्धजन्य पदार्थ तयार होणार आहे. सध्या या ठिकाणी 2 लाख 40 हजार लिटर दूध हाताळणी होते. या ठिकाणी दीडशेपेक्षा अधिक कामगार आहेत. गायीच्या प्रति लिटर दूधास 19 रुपये पन्नास पैसे दर, म्हशीच्या दुधाला 27 रुपये प्रतिलिटर दर दिले जाते. ग्रामीण भागातील दुध उत्पादकांना चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. भविष्यात 6 लाख लिटर दूध संकलन करुन दररोज 30 टन दुध भुकटी करण्याचा संकल्प वैष्णोदवी फुड प्रॉडक्ट कंपनीचे कार्यकारी संचालक नवनीत काकानी यांनी सांगितले.
          सोलापूर येथील डॉ. हेडगेवार रक्तपेढी यांच्याकडून रक्तदान शिबिरामध्ये 51 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले. याकामी डॉ. आनंद वैदय, जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे, संगीता महनते, मनीषा साळुंखे, मारुती बंडगर, अनिल जांभळे, राजु गुजर, पार्वतीबाई कोळी आदींनी परीश्रम घेतले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापक गोपाल चंडक, उपकार्यकारी व्यवस्थापक महेंद्र जाधव, विजय मुळे, श्रीकांत जोशी, शरद बोर्डे, प्रिया जाधव, प्रज्वल शेटटी आदींनी परीश्रम घेतले.
 
Top