उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
          शनिवार, दि. 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7-45 वाजता सोलापूरहून अणदूर  येथे आगमन व राखीव. स. 10-30 वा. अणदूरहून मौ.चिवरी उमरगा, ता.तुळजापूरकडे प्रयाण. स. 11 वा. दत्तुपाटील माध्यमिक विद्यालय,चिवरी या नवीन शाळेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु.2 वा. चिवरी उमरगा येथून  शासकीय विश्रामगृह,तुळजापूरकडे प्रयाण. दु.2-30 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु. 3 वा. कृषी विभागांतर्गत शेततळे लाभार्थ्यांना धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कृषी विज्ञान मंडळ, लातूर रोड,तुळजापूर. सायं.4 वा. मौ.काक्रंबा, ता.तुळजापूर येथील दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर सोयीनूसार अणदूरकडे प्रयाण, आगमन,राखीव व मुक्काम.
 
Top