तुळजापूर -: देशातील 10 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करावे, ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा 2007 ची त्वरित अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक विचार मंचच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मूक मोर्चाद्वारे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन मोर्चा तहसील कार्यालयासमोर येऊन थांबला. यावेळी माधवराव कु तवळ, प्रा. हेमंत वडणे, संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब दीक्षित, उपाध्यक्ष दशरथ कावरे, सचिव रावसाहेब कुलकर्णी, प्रबंधक देविदास हुंडेकरी यांनी आपले मत मांडले. याप्रसंगी नवे राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण त्वरित जाहीर करून अर्थसंकल्पात तरतूद करावी, सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना अंमलात आणावी, यासह अन्य मागण्या मांडण्यात आल्या. तसेच मागण्या माण्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलनात आंबादास पोफळे, जयंत कांबळे, अनंतराव साळुंके, नवनाथ शिंदे, अनंतराव कागदे यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.