उस्मानाबाद :- काटगाव (ता. तुळजापूर)  येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे व स्माशानभूमीचे कुदळ मारुन भूमीपुजन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
          याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यख डॉ.सुभाष व्हट्टे ,जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे  कृषी व पशुसंवर्धन सभापती पडित जोकार, पंचायत समितीच्या सभापती मनिषा पाटील, उपसभापती प्रकाश चव्हाण, सरपंच गणपती माळी यांचेसह पदाधिकारी  उपस्थित होते.
         याप्रसंगी चव्हाण बोलताना म्हणाले की, या भागातील गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी 50 घरे बांधण्यात आली असून त्याचा ताबा लवकरच देण्यात येणार आहे तसेच मागास वस्तीमध्ये रस्त्याचे देखील कामे त्वरीत करण्यात येणार आहे. या भागातील निराधार व्यक्तीना संजय गांधी निराधार योजना , श्रावण बाळ निराधार योजनेतून सर्वांना लाभ मिळत असल्याबदृल त्यांनी समाधान व्यक्त करुन चव्हाण यांनी  तिर्थक्षेत्र विकासासाठी यावेळी 10 लाख रुपयाचे अनुदान जाहिर केले.  पीकर्ज योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज त्वरीत वाटप होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घेण्याचे आवाहन  केले. तसेच यावेळी जि. प.अध्यक्ष डॉ. व्हट्टे, अप्पासाहेब पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top