मुंबई –: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मध्यस्थीने ‘चेन्नई एक्सप्रेस’आणि मराठी चित्रपट ‘दुनियादारी’तील वादावर तोडगा निघाला आहे.    

चेन्नई एक्सप्रेस’चे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव यांची गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सामजस्याने तोडगा काढण्यात आला. यावेळी ‘दुनियादारी’चे प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, स्वप्नील जोशीही उपस्थित होते.
‘चेन्नई एक्सप्रेस’साठी ‘दुनियादारी’ सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातून हटवण्याच्या हालाचाली सुरु झाल्यानंतर मनसेच्या चित्रपट शाखेने एकाही सिंगल स्क्रीन चित्रपटगृहात ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला होता.
    त्यानंतर गुरुवारी सकाळी रोहित शेट्टी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. ‘दुनियादारी’ सध्या बॉक्स ऑफीवरील यशस्वी चित्रपट आहे. शाहरुखचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ रमजान ईदला संपूर्ण देशात प्रसिध्द होत आहे.
 
Top