उस्मानाबाद :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सैन्य दलातील तज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंठ्रीव्दारे सैन्यद‍लात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या ज्या महाराष्ट्रीय   नवयुवक / युवतींना सशस्त्र सैन्य दलाकडून एसएसबी परीक्षेची मुलाखत मिळण्याची  शक्यता आहे, अशा उमेदवारांसाठी एएसबी मुलाखतीचे पुर्व तयारीसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग दि.  17 ते 26 सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे.
      प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामुल्य करण्यात आली असून भोजनासठी प्रति दिवस रुपये 54 प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी 28 ऑगस्ट  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, उस्मानाबाद येथे  शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळप्रतिसह मुलाखतीस हजर रहावे.
      एसएसबीकडून मुलाखतीचे पत्र प्राप्त झाले असल्यास किंवा सीडीएस लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे  प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्रीव्दारे एसएसबीकरीता अर्ज पाठवल्याचा पुरावा सेाबत आणावा, एन. सी. सी. (सी) सर्टिफिकेट अे/ बी ग्रेड धारक उमेदवारांने एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टरने शिफारस केल्याचे प्रमाणपत्र, एनडीए मधील परिक्षा उत्तीर्णचा पुरावा, सैन्यदलात अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्निकल/ मेडीकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास  त्या अर्जाची छायांकित प्रत सोबत घेवून यावे.
     पात्र उमेदवारांनी वरील प्रशिक्षण वर्गाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मेजर (नि) सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांचा संपर्कासाठी दुरध्वनी क्रं 0253-2451032 असा आहे.
 
Top