मुंबई -: सीमा प्रश्नासह राज्याच्या विविध विषयावर विधिमंडळाच्या उभय सभागृहात हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी मांडलेले विचार आजही राज्यातील राजकीय अभ्यासकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेत. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राने 'चतुरस्त्र' नावाचा ग्रंथ प्रकाशित केला आहे तो जनतेसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती या केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी आज येथे दिली.
स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाने विविध उपक्रम घेण्याची घोषणा केली होती. त्या अंतर्गत स्व.वसंतराव नाईक यांची विधिमंडळातील विविध विषयांवरची, जनतेला उपयुक्त होणारी, प्रबोधनात्मक भाषणे निवडून ती ग्रंथरुपाने तयार करण्याचे काम वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राकडे सोपविण्यात आले होते. या केंद्राने अत्यंत अल्पवेळात जवळपास 10 विषयांवर त्यांची निवडक भाषणे संपादित केली. जवळपास 600 पानांचा हा ग्रंथ अवघ्या 400 रुपयात नागरिकांना उपलब्ध झाला आहे. या ग्रंथात अ.भा.साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी प्रस्तावना लिहिली आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आपले संपादकीय मतही या ग्रंथात नोंदविले आहे, ज्येष्ठ पत्रकार वसंत देशपांडे, दिलीप चावरे व नागेश केसरी यांनी संपादित केलेला हा ग्रंथ राजकीय अभ्यासकांना केवळ उपयुक्त ठरणार नाही तर तो आजच्या संदर्भात मार्गदर्शनपर ठरणार आहे. हा ग्रंथ शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई व या मुद्रणालयाच्या राज्यातील सर्व डेपोमध्ये 400 रुपये या किंमतीत उपलब्ध आहे.
या ग्रंथात 1972 चा दुष्काळ, त्या काळात आलेल्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चेला उत्तर, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, रोजगार हमी योजनेची संकल्पना यासह अनेक विषयावर त्यांची भाषणे आहेत. त्या काळातील विरोधी पक्ष आणि सत्तारुढ पक्ष यांचे असलेले संबंध आणि त्याला स्व. वसंतराव नाईक यांनी दिलेले उत्तर असा हा दस्तावेज वाचनीय आहे. या ग्रंथात स्व. नाईक यांची विविध भावमुद्रा असलेली पेन्सिल छायाचित्रे आहेत. शासकीय मुद्रणालयातील कर्मचाऱ्यांनी व कला दिग्दर्शकांनी अल्पावधीत मेहनत करुन हा ग्रंथ निर्माण केला आहे. राजकीय अभ्यासकांना, पत्रकारांना हा ग्रंथ निश्चितच संग्राह्य, मार्गदर्शक व आजच्या संदर्भात प्रबोधन करणारा तसेच इतिहास प्रेमींना इतिहास जाणून घेण्यासाठी अधिक प्रोत्साहित करणारा असा हा ग्रंथ आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात या ग्रंथाचे प्रकाशन केले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या उत्कृष्ट ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर करुन ते देशभरातील जनतेला, अभ्यासकांना उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन त्या कार्यक्रमात करुन या ग्रंथाचा आणि संपादक मंडळाचा एकाअर्थाने गौरवच केला आहे, असेही केसरी यांनी सांगितले.