मुंबई -: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच झालेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2013 मध्ये येथील केंद्रीय हज कमिटीच्या आयएएस प्रशिक्षण केंद्रातील 9 मुस्लिम विद्यार्थ्यांनी भरीव यश मिळविले आहे. यात महाराष्ट्रातील 4 विद्यार्थ्यांचा समावेश असून पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले हे सर्व विद्यार्थी आता मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करीत आहेत, अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे संचालक सयीद सादिक अली कादरी यांनी दिली.
मुस्लिम समाजातील विद्यार्थीही आयएएस –आयपीएस बनावेत या उद्देशाने केंद्रीय हज समितीमार्फत येथील हज हाऊसमध्ये 2010 पासून हे मोफत प्रशिक्षण केंद्र चालविले जात आहे. आतापर्यंत या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या 2 विद्यार्थ्यांनी युपीएससीच्या अंतिम परिक्षेत यश मिळवून आयएएस –आयपीएस पदे मिळविली आहेत. यंदाच्या वर्षी युपीएससी पूर्व परीक्षेत या केंद्रातील 24 पैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता हे विद्यार्थ्यी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करीत असून त्यातही ते यशस्वी होतील, असा विश्वास श्री. कादरी यांनी व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये मोहम्मद फैजुद्दीन (हैद्राबाद, आंध्रप्रदेश), फैजान मुल्ला (कोल्हापूर, महाराष्ट्र), साहेब आलम (सिवन, बिहार), डॉ. परवेज आलम (पूर्व चंपारण, बिहार), शाहनवाज अली (पूर्व चंपारण, बिहार), शकील अन्सारी (नंदुरबार, महाराष्ट्र), तारिक अन्सारी (भिवंडी, महाराष्ट्र), आसिफ यतनाल (सोलापूर, महाराष्ट्र), खत्री अताउल्लाह (वडोदरा, गुजरात) यांचा समावेश आहे.
या प्रशिक्षण केंद्रात नसलेल्या पण पूर्व परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या देशातील इतर मुस्लिम विद्यार्थ्यांनी आता मुख्य परिक्षा आणि मुलाखतीच्या मोफत तयारीसाठी या केंद्रात अर्ज करावा, असे आवाहन श्री. कादरी यांनी केले आहे.
केंद्रीय हज कमिटीचे अध्यक्ष कैसर शमीन, मुख्य कार्यकारी अधिकारी अताउर रहमान यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना मुख्य परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.