मुंबई : महाराष्ट्र राज्य नेहमीच प्रगत राहिले आहे. अन्य राज्यापेक्षा महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. आज जगातील कित्येक राष्ट्रांपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने देशालाच नाहीतर जगाला नेतृत्व देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज बुधवार रोजी येथे केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विलासराव देशमुख केंद्राच्यावतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे विलासराव देशमुख स्मृती व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.
याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे उप सभापती वसंत डावखरे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, अल्पसंख्यांक विकास मंत्री नसीम खान, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, आमदार माणिकराव ठाकरे, दिवाकर रावते, माजी आमदार प्रा. जनार्दन चांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विलासराव देशमुख यांनी लहान गावातून आपल्या राजकारणाची सुरुवात करुन ते राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले तरुणांसाठी हा आदर्श आहे. त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कुठल्याही कठीण प्रसंगी त्यांनी आपले हास्य ढळू दिले नाही.विलासराव देशमुख हे एक हरहुन्नरी आणि बहुआयामी असे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या नावाने विलासराव देशमुख केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या सारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची पिढी तसेच युवा नेतृत्व घडविण्याचे त्याचबरोबर सामाजिक समतेचे काम केले जाईल, अशी आशा व्यक्त करुन विलासराव देशमुख केंद्रासाठी आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासनामार्फत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवाजीराव देशमुख यावेळी म्हणाले, विलासराव देशमुख यांची प्रशासनावर चांगली पकड होती. सहकाऱ्यावर अन्याय होऊ नये अशी त्यांची नेहमी भूमिका असायची. महाराष्ट्राचा सर्वागीण विकास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राज्याचे नेतृत्व केले.
विलासराव देशमुख यांची सभागृहातील भाषणे सभागृहातील नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शन करणारी होती. त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वावर बाभूळगांवचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र शासनात मंत्री म्हणून देश पातळीवर काम केले. राजकारणात त्यांनी अनेक मित्र जोडले. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे त्यांचे कौशल्य होते, असे दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी सांगितले.