सोलापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा  कार्यक्रम संपन्न झाला.. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेतील तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील यशस्वी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यंदा जिल्ह्यातील 5 पोलीस अधिकारी / कर्मचा-यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबदृल अभिनंदन केले. तसेच स्वातंत्र्य चळवळीतील शहीदांना विनम्र अभिवादन करुन उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.
    कार्यक्रमास आमदार सिद्रामप्पा पाटील, जि.प. अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, माजी आ. विश्वनाथ चाकोते, नरसिंग मेंगजी, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.एन. मालदार यांच्यासह जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिक, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक  आणि नागरिक उपस्थित होते.
नुतन प्रांत कार्यालयाचे उद्घाटन
    शासकीय ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते दक्षिण आणि अक्कलकोट या तालुक्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या उपविभागीय कार्यालय क्र. 2 (प्रांत कार्यालय) चे उद्घाटन झाले..
    यावेळी आ. सिद्रामप्पा पाटील, दिलीप माने, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार,. अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी गुरव, या कार्यालयाचे प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, दक्षिणच्या तहसिलदार  शिल्पा ठोकडे, दक्षिणच्या सभापती श्रीमती इंदुमती अलगोंडा पाटील, करमणुक कर अधिकारी रामलिंग चव्हाण, मनपा सहायक आयुक्त पंकज जावळे आदींची उपस्थिती होती.
 
Top