उस्मानाबाद -: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती असलेल्या दिलखुलास कार्यक्रमात राज्यातील पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनेच्या माहिती संदर्भात या विभागाचे मंत्री मधुकर चव्हाण यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
या कार्यक्रमात राज्यातील पशुधनाची माहिती, दुध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान आणि सवलती, मत्स्यव्यवसाय वाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती देण्यात आली आहे. ही मुलाखत दि.16 आणि 17 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारीत केली जाईल. प्रदीप भिडे यांनी ही मुलाखत घेतली असून जिल्ह्यातील नागरिकांनी ही मुलाखत आवर्जून ऐकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.