बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानामधून नूतन शिधापत्रिका वितरण सुरु आहे. सदरच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने आकारण केलेल्या रक्कमपेक्षा जादा रक्कम मनमानी पध्दतीने दुकानदार वसूल करीत असल्याची लेखी तक्रार शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण गायकवाड यानी तहसिल कार्यालयात दिली आहे.
                सदरच्या तक्रारीत आगळगाव (ता. बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानदार प्रत्येक शंभर ते दिडशे रुपये वसूल करत आहेत. पैसे न दिल्यास कार्ड मिळणार नाही व त्यावरील रॉकेल व धान्य देणार नाही. तक्रार केल्यास तुम्हाला कार्ड कधीच मिळणार नाही, अशी धमकीही देत आहेत. युवा सेनेच्या माध्यमातून दिलेल्या तक्रारीत प्रशसनाने आठ दिवसात कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन केले जाईल व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
Top