उस्मानाबाद :- बेरोजगार उमेदवारांसाठी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन रमेश पवार, सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, बेरोजगार उमेदवारांची शासकीय नोकऱ्यांची सद्यस्थिती व मोठया प्रमाणात असलेलेी स्पर्धा लक्षात घेता खाजगी क्षेत्रातील नामवंत / प्रतिथयश आस्थापनाकडे मिळत असलेल्या नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची तयारी ठेवून उद्योगक्षेत्रात आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवून कर्तत्व सिध्द करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी कंपनीचे अधिकारी / प्रतिनिधींनीचा स्वागत करुन रोजगार मेळाव्यास मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन महालिंग बळे, कनिष्ठ रेजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. या मेळाव्यात पुणे, नाशिक, व औरंगाबाद आदि जिल्ह्यातील 6 कंपन्यातील खाजगी क्षेत्रातील उद्योजक / कंपनींचे प्रतिनिधी सहभागी होवून जिल्ह्यातील 164 उमेदवारांची मुलाखती घेतली त्यातुन 141 उमेदवारांची प्राथमिक निवड केली आहे.