वॉशिंग्टन : किडनीचा आजार झाल्याची शंका आल्यास लगेच रुग्णालयात जाण्याची गरज नाही. आता संशोधकांनी पोर्टेबल आकाराचे उपकरणे विकसित केले आहे. ते स्मार्टफोनला जोडल्यानंतर त्यावर किडनीची चाचणी करणे शक्य होणार आहे. या गॅजेटमुळे रुग्णालयात सारख्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही. मधुमेही आणि इतर आजार असलेल्या लोकांना हे गॅजेट उपयोगी ठरणार आहे. हेन्री सॅम्युएल स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँन्ड अप्लाईड सायन्स व अयडॉगन लॅब यांच्यावतीने याची निर्मिती करण्यात आली आहे.


 
Top