मुंबई -: नव-नवे बदल करुन नेटीझन्सना आपल्याकडे खेचणा-या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवा बदल आणला आहे. चॅटिंगसह, फोटो पाठवणे यासारख्या सुविधेनंतर फेसबुकने आता पुढचं पाऊल टाकलं आहे. आता फेसबुकवरुन एका वेळी अनेक जणांना एका सेम अल्बममध्ये फोटो अपलोट करता येतील. या नव्या फिचरमुळे युझर्सना एकाच वेळी तब्बल दहा हजार फोटो अपलोड करता येणार आहे.
    तुमच्या मित्रांचा ग्रुप पिकनिकला गेला आहे. त्यावेळी प्रत्येकाने आपआपल्या मोबाईमध्ये फोटो काढले आहेत. अशावेळी एकाच्या मोबाईलमध्ये असणारे फोटो दुस-याकडे असतीलच असे नाही.‍ त्यामुळे एखादया मित्राने या पिकनिकचा फोटो अल्बम तयार केला असेल, तर त्या ग्रुपमधील प्रत्येकजण या अल्बममध्ये फोटो अपलोड करु शकतो. तशी सुविधा फेसबुकने आणली आहे.
    जो कोणी अल्बम क्रिएट करेल, तो त्याचं ॲक्सेस पन्नास मित्रांना देऊ शकेल आणि प्रत्येकजण सुमारे दोनशे फोटो अपलोड करु शकेल. अल्बम क्रिएटर अल्बमधील अन्य मित्रांना त्यांचे कंट्रोल देऊ शकतो. जेणेकरुन ते इतरांना इन्व्हाईट करु शकतील किंवा क्रिएटर याचं कंट्रोल स्वत:कडेही ठेवू शकतो. यापूर्वी युझर्स त्याने क्रिएट केलेल्या अल्बममध्ये फोटो अपलोड करु शकत होता. त्याची मर्यादा एक हजार फोटो पर्यंत होती. मात्र आता या नव्या सुविधेमुळे नेटीझन्सना फोटोविश्व तयार करता येणार आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट असलेल्या फेसबुकने फोटो अल्बम शेअर करण्याचे नवे फिचर दिले आहे. या नव्या फिचरमुळे युझर्सना एकाच वेळी तब्बल दहा हजार फोटो अपलोड करणे शक्य होणार आहे. सध्या हे फिचर केवळ अमेरिकेतील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.
    या फिचरमुळे एकाच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व्यक्तींचे फोटो एकत्रितपणे अपलोड करणे शक्य होणार आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे, लग्नाचे किंवा मित्रासोबतच्या सहलीचे फोटो एकाच वेळी अपलोड करुन त्या फोटोतील सर्व व्यक्तींबरोबर शेअर करता येणार आहे.
 
Top