महाराष्ट शासनाच्या मंत्रालयीन  विभाग व महाराष्ट लोकसेवा आयोग कार्यालयातील एकूण 89 पदाची भरती पुर्व परिक्षा दि. 29 सप्टेंबर 2013 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने 3 सप्टेंबर 2013 पर्यंत www.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर सादर करावेत.
वयोमर्यादा : 
1) डिसेंबर 2013 रोजी किमान 19 वर्ष् 33 वर्षापेक्षा  जास्त  नसावे.
2) मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष शिथिल.
3) अपंग उमेदवार 45 वर्षापर्यंत
4) पात्र खेळाडू 5 वर्षे शिथिल.
पात्रता : 
 1) मान्यता प्राप्त विदयापीठाची पदवी किंमता समतूल अर्हता
2) पदवी शेवटच्या वर्षात बसलेले उमेदवार पूर्वपरीक्षेत तात्पुरते पात्र असतील. मुख्य परीक्षाच्यावेळी पदवी पूर्ण असणे आवश्यक.
शुल्क : अमागास - 260/-, मागासवर्गीय - 135/-
बदलेला अभ्यासक्रम : सर्व परीक्षा 100 प्रश्नांची असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. एकुण गुण 100, प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण, परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे, एकूणसात घटकांचा समावेश.
1) चालू घडामोडी : यासाठी दैनिक वर्तमानपत्रे व स्पर्धा परीक्षेसाठी वापरली जाणारी चाणक्य मंडळ, युनिक बुलेटीन, स्पर्धापरीक्षा ही मासिके वापरावित.
2) नागरिकशास्त्र : यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्यव्यवस्थापन, ग्रामप्रशासन या घटकांचा समावेश आहे.
संदर्भ : भारताचे शासन आणि राजकारण - बी.बी. पाटील, महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण - बी.बी. पाटील, महाराष्ट्राची प्रशासकी व्यवस्था - प्रा.के.आर. वेग, महाराष्ट्रातील पंचायतराज - मनोज आवळे / संजय खंदारे, राज्यशास्त्र - 12 वी सेठ प्रकाशन
3) आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास -
1) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. एस.एस गाढाळ
2) आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - डॉ. अनिल कठारे
3) आधुनिक भारताचा इतिहास - सेठ प्रकाशन
4) महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी पाठयपुस्तक
5) महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास - के.सागर
4) भुगोल : (महाराष्ट्राच्या भुगोलाच्या विशेष अभ्यासासह) - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नदया, उदयोधंदे आदी.
संदर्भ : 1) द मेगा महाराष्ट्र - ए.पी सवदी
2) महाराष्ट्राचा भूगोल - खतीब
3) शालेय पुस्तके - 8, 9, 10 वी
4) नवनीत ॲटलास
5) अर्थव्यवस्था : यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उदयोग, परकीय व्यापार, बँकिग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषित नीती आदी.
संदर्भ - 1) भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे
2) अर्थशास्त्र भाग 1/2 - देसले
3) वाणिज्य व अर्थव्यवस्था - डॉ. राम पाटील
6) सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
संदर्भ : 1) आठवी ते दहावीची शालेय पुस्तके
2) संपूर्ण विज्ञान - जयदीप पाटील / चंद्रकांत गोरे
3) विज्ञान व तंत्रज्ञान - डॉ. विशाल माने
7) बुध्दिमापन चाचणी
संदर्भ : 1) अनिल अंकलगी - बुध्दिमापन चाचणी
2) बुध्दिमापन चाचणी - सुजित पवार
3) बुध्दिमापन चाचणी - पंढरीनाथ राणे / दांडेकर
8) अंकेगणित :
संदर्भ : 1) गणित गुरु - प्रा. शांताराम अहिरे
2) Magic Maths - कोकीळा प्रकाशन
3) गणित - पंढरीनाथ राणे, दोडेकर

    सहाय्यक पदासाठी 100 प्रश्न असल्यामुळे काठीण्यपातळी अधिक असल्याची शक्यता आहे. PSI पूर्व परीक्षा झाल्यानंतर सहाय्यकची तयारी करणा-या उमदेवारांनी अर्थशास्त्र या विषयाकडे अधिक लक्ष दयावे. STI मुख्य परीक्षेचा अर्थशास्त्र हा घटक चांगला केल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल. कोणतीही परीक्षा पास होण्याचे गुपित अधिक सराव व आत्मपरीक्षण हेच असू शकते. अधिक माहितीसाठी संस्केतस्थळावर भेट दयावी.
 
* सौजन्य - दै. पुढारी
 
Top