उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे तीन दिवस उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार, दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10-30 वा. सोलापूरहून काटगाव, ता. तुळजापूर   येथे आगमन व धनगर समाजासाठी आमदार निधीतून बांधकाम करावयाच्या समाज मंदिराचे भूमीपूजन कार्यक्रम व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन बांधकाम करावयाच्या जागेचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दु.2-30 वा. शहापूर जिल्हा परिष्द मतदार संघातील पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा, स्थळ-पेट्रोलपंप, नळदुर्ग व सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. अणदूर येथे आगमन, राखीव व मुक्काम.
       शुक्रवार, दि. 30 रोजी सकाळी 11 वा. अणदूर येथून किल्लारी ता.औसा,जि. लातूरकडे प्रयाण, सायं. 4 वा. किल्लारीहून नळदुर्ग येथे आगमन व राखीव. सायं.5 वा. नळदुर्ग नगर परिषदेने आयोजित समाज विकास संस्थेतर्फ बचत गटाना प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- हुतात्मा स्मारक नळदुर्ग व सोयीनुसार अणदूरकडे प्रयाण.अणदूर येथे  आगमन व मुक्काम.
         शनिवार, दि. 31 ऑगस्ट रोजी अणदूरहून उमरगाकडे प्रयाण, स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, उमरगा येथे आगमन व राखीव. स.11 वा. इन्स्पायर ॲवार्डअंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमास उपस्थिती.  स्थळ- आदर्श महाविद्यालय, उमरगा. सोयीनुसार उमरगा येथून अणदूरकडे प्रयाण, अणदूर येथे आगमन व राखीव, सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.              
 
Top