उस्मानाबाद :-  जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथील अर्श कार्यक्रमातंर्गत नुकतेच अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवसी शाळा, वैराग रोड उस्मानाबाद येथे किशोरवयीन मुलींचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
          या मार्गदर्शन शिबीरामध्ये शासकीय किशोरवयीन अवस्थेतील समस्या व आहार, शारीरिक व मानसिक बदल तसेच प्रजनन व लैगिक आरोग्य, गुप्तरोग तसेच अर्श मैत्री क्लिनीकबाबत मागदर्शन करण्यात आले. तसेच एचआयव्ही एडसबदल असलेले समज व गैरसमज व किशोरवयीन मुलीमध्ये रक्तक्षय कमी करण्यासाठीच्या उपायांची माहिती यावेळी देण्यात आली. अर्श कार्यक्रमा संबधी माहितीपट दाखविण्यात आला तसेच शिबीरामध्ये किशोरवयीन मुलीनी विचारलेल्या शंकाचे निराकरण  शात्रीय दृष्‍टिकोणातुन उदहरणासह सखोल अशा माहितीसह करण्यात आले. या शिबीरास स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. शिल्पा हंबीरे, डॉ वृधा वीर, श्रीमती सुनिता साळुंके, अमर सपकाळ, मुख्याध्यापक एन. ए. शिंदे गृहपाल श्रीमती एल. के. घुगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जालींधर माळी, विनोद गायकवाड, श्री लगदिवे व निवासी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

 
Top