संतोष जाधव
औरंगाबाद -: मराठवाडा स्तरावरील पत्रकारांसाठी कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष वार्ता आणि शोध वार्ता या दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात येणार असून मराठवाड्यातील पत्रकारांनी या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी केली आहे.
    कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धा मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात येते. यावर्षी कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता स्पर्धेचे २१ हे वर्ष आहे. या स्पर्धेसाठी मराठवाड्यात काम करणार्‍या दैनिक, साप्ताहिक व नियतकालिकाच्या पत्रकारांना या स्पर्धेत भाग घेता येईल. या स्पर्धेसाठी वार्तापत्र १ ऑगस्ट २0१२ ते ३१ जुलै २0१३ या कालावधीत प्रकाशित झालेले असावे. प्रवेशिकेच्या मूळ प्रतीवर दैनिकाचे नाव, दिनांक आणि पत्रकाराच्या नावाचा छापील उल्लेख असावा. नसल्यास संपादकाचे पत्र जोडावे. हा पुरस्कार दोन गटांत गुणाणुक्रमे येणार्‍या पहिल्या तीन विजेत्यास बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येईल.
    कै. अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कारांच्या प्रवेशिका या मूळ प्रत व त्याच्या ३ झेरॉक्स अशा ४ प्रतीत व्यवस्थित जोडणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या पत्रकारांनी आपली प्रवेशिका १0 सप्टेंबर २0१३ पर्यंत संतोष जाधव, अध्यक्ष, पत्रकार भवन, आंबेडकर पुतळय़ाजवळ, उस्मानाबाद या पत्त्यावर पाठवायचे आहेत. या सर्व स्पर्धेमध्ये मराठवाड्यातील जास्तीत जासत पत्रकारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, सचिव राजाभाऊ वैद्य, कोषाध्यक्ष संतोष हंबिरे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.
 
Top