उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेच्यावतीने येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे सोमवार, दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (सा) दादासाहेब वानखेडे यांनी दिली आहे.