उस्मानाबाद -: ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पावसाने ताण दिल्याने सोयाबीन, तूर, कापूस व इतर हंगामी पिकावंर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या ताणास प्रतिकार करण्यासाठीची शक्ती पिकात निर्माण व्हावी, म्हणून खरीप, कोरडवाहू पीकावर 0:0:50: किंवा 13:0:45 यापैकी एक द्रवरुप खत 50 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करुन पिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची क्षमता असेल, त्यांनी स्प्रिंकलव्दारे पिकास पाणी देवून पीक संरक्षणाबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन केले.
तसेच ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची क्षमता असेल, त्यांनी स्प्रिंकलव्दारे पिकास पाणी देवून पीक संरक्षणाबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन केले.