उस्मानाबाद :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात दि.17 सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सकाळी 9 वाजुन 5 मिनीटांनी होणार आहे. तत्पुर्वी जिल्हाधिकारी आवारातील हुतात्मा स्तंभास सकाळी 8 वाजुन 50 मिनीटानी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केले जाणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पुर्वतयारीची बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध विभागांना सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी अशा सूचना पाटील यांनी दिल्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजय चारठाणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.