नळदुर्ग -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ औरंगाबाद आणि कला विज्ञान व वणिज्य महाविदयालय नळदुर्ग यांच्या संयुक्त विदयामाने मंगळवार रोजी झालेल्या आंतर महाविदयालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धकांचा महाविदयालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. दि. 3 रोजी झालेल्या या स्पर्धेसाठी औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्हयातील जवळपास 180 सर्प्धेकांनी सहभाग नोंदविला होता. 140 मुले व 40 मुली सहभागी होत्या. स्पर्धेची सुरुवात महाविदयालयाच्या प्रागंणात प्राचार्य डॉ. सुहास पेशवे यांच्या हस्ते विदयापीइाच्या ध्यवजारोहणाने करण्यात आली.
नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर असलेल्या गोलाईपासून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. मुलांसाठी बारा किलोमीटर व मुलींसाठी सहा किलोमीटर अंतर पार करण्याची ही स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये अंकुश संजय मिसाकर (सिध्दार्थ कॉलेज जाफ्राबाद) हा प्रथम आला तर खंडू अशोक व्हरकेट (द्वितीय) कला, विज्ञान व वाणिज्य महादियालय नळदुर्ग, दत्तात्रय बागुल (तृतीय) व्ही.पी. कॉलेज, वैजापूर, दिगंबर भुतेकर (चौथा) सिध्दार्थ कॉलेज जाफ्राबाद, सुरज गायकवाड (पाचवा) श्री छत्रपती कॉलेज उमरगा, अविनाश दाणे (सहावा), पी.जी. जिमखाना औरंगाबाद यांनी मुलांमध्ये यश संपादन केले आहे. तसेच मुलींमध्ये प्रियंका किशोर भरडे (प्रथम) श्री माधवराज पाटील महाविदयालय मुरुम, कु. अश्विनी नामदेव फरताळे (द्वितीय) के.एस.के. कॉलेज, बीड, कु. प्रगती रामहरी ठोंबरे (तृतीय) कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालय धानोरा, कु. गीता केरुरकर (चौथी) पी.जी. जिमखाना औरंगाबाद, कु. जयश्री निरडे (पाचवी) श्री स्वामी रामानंद तीर्थ महाविदयालय अंबाजोगाई, कु. अर्चना पवार (सहावी) जनविकास कॉलेज वनसारोळा यांनी यश संपादन केले. या स्पर्धेसाठी विदयापीठातील व महाविदयालयातील प्रा. मसूद हाश्मी, प्रा. सुरेंद्र मोदी, प्रा. नितीन निरवणे, प्रा. अभिजित दिरखत, प्रा. सिमा मुंडे, प्रा. भिलिसिंग जाधव, प्रा. काकासाहेब शिंदे, प्रा. एस.एस. घोरपडे, प्रा. कपील सोनटक्के यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नळदुर्ग, शहर शिवसेना यांनी रुग्ण वाहिका देऊन व नळदुर्ग पोलिसांनी बंदोबस्त देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.