उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघटनेच्यावतीने आयोजित शिस्तबध्द श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा-2012 चे बक्षिस वितरण शुक्रवार दि. 6 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री मधूकरराव चव्हाण यांच्या हस्ते व आमदार राणा रणजितसिंह पाटील, गोदावरील खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. राहूल मोटे, उमरगाचे आ.ज्ञानराज चौगुले, उस्मानाबादचे आ.ओमराजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे बक्षिस वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत अडसुळ हे राहणार आहेत.
सन 2012 मध्ये झालेल्या गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेत प्रथम आलेल्या गणेश मंडळास स्व. हिराबाई नंदकिशेार मंत्री यांच्या स्मरणार्थ संजय मंत्री यांच्यावतीने 10 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह, व्दितीय येणाऱ्या मंडळास डॉ. सचिन देशमुख यांच्यावतीने 7 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, तृतीय बक्षिस कै. सुभाष पोतदार यांच्या स्मरणार्थ पत्रकार महेश पोतदार यांच्यावतीने 5 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत.
तसेच उत्तेजनार्थ कै. रसीकाबाई आडसुळ यांच्या स्मरणार्थ पत्रकार अनंत आडसुळ यांच्यावतीने 3 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह, कै. धनंजय बोधले यांच्या स्मरणार्थ ॲड. राघवेंद्र बोधले यांच्यावतीने 3 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह आणि राज डिजीटलचे राज ढवळे यांच्यावतीने 3 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात मागील वर्षी विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व गणेशभक्त, नागरीक व गणेश मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे सरचिटणीस रविंद्र केसकर यांनी केले आहे.