
पोलीस वसाहतीमधील लिटस स्टार बालवाडी सौ. मिना रविंद्र कुलकर्णी हया ब-याच वर्षापासून चालवत आहेत व दरवर्षी विविध कार्यक्रम घेऊन बालगोपालामध्ये शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड निर्माण करतात. यावर्षीचा दहीहंडी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला असून या कार्यक्रमास पोलीस अधिक्षक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर बरेच वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बालवाडी असल्याकारणाने दहीहंडीच्या कार्यक्रमात छोटे बालक कृष्णासारखेच दिसत होते, असे चित्र यावेळी दिसले. बालकांच्या या कार्यक्रकमाचा सर्वांनी कौतुक करुन पालकताई सौ. मिना कुलकर्णी यांचेही सर्वांनी अभिनंदन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालवाडीच्या सेविका लता वाघमारे व भारतीबाई यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व विदयार्थी पालक व वसाहतीमधील पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय मोठया संख्येने उपस्थित होते.