कळंब - जीप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवार रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास डिकसळ (ता. कळंब) शिवारात घडला.
प्रकाश महादेव जगताप (वय 35 वर्षे), अशोक विश्वनाथ डिसले (वय 19 वर्षे) दोघे रा. पिंपळगाव (डोळा) ता. कळाब असे अपघात ठार झालेल्यांचे नाव आहे. यातील प्रकाश जगताप अशोक डिसले हे दोघे दुचाकीवरून (एमएच 14 एपी 8982) गावाकडे जात होते. याचवेळी ढोकीकडून भरधाव येणारी जीपची (क्र. एमएच 12 बीपी 6746) डिकसळ शिवारात समोरून येणार्या दुचाकीला धडकली. यामध्ये दोन्ही दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत सावळे करीत आहेत.