नळदुर्ग -: अंधश्रध्‍दा निर्मूलन समितीचे संस्‍थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्‍या हत्‍येनंतर महाराष्‍ट्रभर निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर विवेकवादी संस्‍था, संघटनांच्‍यावतीने आम्‍ही विवेकावादी आहोत, असे सांगण्‍याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मंगळवार दि. 17 सप्‍टेंबर रोजी आलियाबाद (ता. तुळजापूर) येथे आम्‍ही विवेकवादी निर्धार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. राष्‍ट्रसेवा दल संचलित आपलं घर, आलियाबाद या ठिकाणी सकाळी 11 ते 3 या वेळेत ही परिषद होणार असून या परिषदेस ज्‍येष्‍ठ समाजवादी विचारवंत पन्‍नालाल सुराणा, शितल वाघमारे, अॅड. राज कुलकर्णी, डॉ. शशिकांत अहंकारी हे आपल विचार व्‍यक्‍त करणार आहेत. ही परिषद भारतीय संविधानाने घालून दिलेली मूल्‍य व सनदशीर अहिंसात्‍मक मार्गावर विश्‍वास असणा-यांसाठी खुली आहे. यात जास्‍तीत जास्‍त नागरिकांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन अॅड. देविदास वडगावकर, शिवाजी पोतदार, शरद गायकवाड, भारती ठवळे, प्रा. किरण सगर, शैलजा भस्‍मे यांनी केले आहे.
 
Top