उस्मानाबाद -: एका शेतकर्याचा झाडाखाली थांबल्यानंतर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. 11 सप्टेंबर दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तावरजखेडा (ता. उस्मानाबाद) येथे घडली. तसेच वाशी तालुक्यातील सारोळा (मां) येथे वीज पडून एका शेतकर्याचा मृत्यू तर एकजण जखमी झाला आहे.
व्यंकट रामकिसन फेरे (40) हे आपल्या शेतात दुपारी गेले होते. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला. मधूनच विजांचा कडकडाटही होत होता. भिजू नये म्हणून त्यांनी शेतातील पांगरीच्या झाडाखाली आसरा घेतला. तेव्हाच दुपारी 4.30 वाजता झाडावर वीज पडली. यामध्ये फेरे यांचा जागीच मृत्यू झाला. विजेच्या प्रहारामुळे विशाल असणारे पांगरीचे झाडही उद्ध्वस्त झाले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ढोकी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
वीज पडून फेरे ठार झाल्याची माहिती 5.30 वाजेच्या दरम्यान कुटुंबीयांना समजली. त्यांचा मुलगा कार्तिक फेरे हा त्यांना शोधण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यावेळी पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला. तसेच मनसेचे कार्यकर्ते मुरली देशमुख यांनीही पोलिसांना माहिती दिली. मात्र, रात्री 10.00 वाजेपर्यंत पोलिस घटनास्थळी आले नाहीत. यामुळे मृतदेह तेथेच होता. तावरजखेडा ढोकीपासून 18 किलोमीटरवर आहे. पोलिस अगोदर ठाण्यात येऊन माहिती लेखी स्वरूपात देण्याचा आग्रह करीत होते. या प्रकारामुळे मृतदेहाची चार तास अवहेलना झाली. याप्रकरणी साहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभाकर वाघ यांनी सांगितले की, माहिती उशिरा मिळाल्यामुळे लवकर जाता आले नाही.

सारोळा येथे एक ठार, एक जखमी
वाशी तालुक्यातील सारोळा (मां.)येथे वीज पडून एक ठार तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना बुधवार रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सारोळा (मां.) शिवारातील डोंगरेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात घडली आहे. यात बाळासाहेब अंकुश मोरे (42, रा. सारोळा) यांचा जगीच मृत्यू झाला, तर अशोक बापूराव दराडे (23, रा. सारोळा) हे गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर दोघांनाही वाशी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.