उस्मानाबाद - कळंब व उस्मानाबाद तालुक्यातील सोयाबीनसह इतर पिक पावसाअभावी वाळून जात आहेत. त्‍याकरीता याचा तातडीने पंचनामा करण्‍याची मागणी  आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जिल्‍हाधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
    यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद व कळंब तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाची मोठय़ा प्रमाणात पेरणी झाली आहे. गेल्या महिन्यापासून या तालुक्यात कसलाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन व अन्य पिके शेंगा भरण्याच्या काळात करपून गेली आहेत. शेतकर्‍यांनी सोयाबीन व अन्य पिकांचे उत्पादन घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. एकंदरीत पीक शेतकर्‍यांच्या पदरात पडण्याची शक्यता नाही. यामुळे पिकांचे पंचनामे करावेत, तसे आदेश तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदारांना द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्‍यांनी निवेदनात दिला आहे.
 
Top