उस्मानाबाद -: दोन वेगवेगळया ठिकाणी तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी अचानक छापा मारुन अकरा जुगा-यांना गजाआड केले. तर त्यांच्याकडून मोबाईल, जुगा-याचे साहित्य, रोख रक्कम असे मिळून सुमारे साठ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. बुधवार रोजी ढोकी (ता.जि. उस्मानाबाद) पेट्रोल पंप चौकात, कसबा रोड ढोकी या ठिकाणी तर मौजे खेड (ता.जि. उस्मानाबाद) येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
बाळासाहेब शिवाजी लोमटे (वय 50 वर्षे), रविंद्र बाबुराव कोळी (वय 30), बापु शिवाजी मुरमे (वय 60), बाबुराव समुद्रे (वय 42), आनंद सरपाळे (वय 32) (सर्व रा. ढोकी, ता.जि. उस्मानाबाद), हनुमंत लोमटे (वय 35), संजय गरड (वय 34), भारत गरड (वय 35), विश्वंभर गरड (वय 35), युनुस तांबोळी (सर्व रा. खेड, ता.जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या जुगा-यांचे नावे आहेत. यातील ढोकी येथील पेट्रोल पंप कसबा रोड येथे पोलिसांनी छापा मारला असता, जुगा-याचे साहित्य, मोबाईल, रोख रक्कम असे मिळून 54 हजार 710 रुपये व सहा आरोपींना रंगेहाथ पकडले तर खेड येथे 5 हजार 150 रुपये व पाच आरोपींना अटक केले आहे. वरील दोन्ही धाडीत 59 हजार 860 रुपयाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.