मुंबई -: न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने व सामोपचाराने निपटारा व्हावा याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दि. 23 नोव्हेंबर रोजी भारतातील सर्व न्यायालये प्राधिकरणे येथे राष्ट्रीय लोक अदालत भरविण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये तसेच प्राधिकरणे येथे दि. 23 नोव्हेंबर, 2013 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
   त्यामुळे दि. 22 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेली महा लोकअदालत दि. 23 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत विलीन करण्यात आली आहे. त्यामुळे 22 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आलेली सर्व प्रकरणे 23 नोव्हेंबर च्या राष्ट्रीय लोक अदालतीत ठेवण्यात येतील, असे  सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविले आहे.
 
Top