उस्मानाबाद -: आ. राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने सुपरलाइक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रतिष्ठाणच्यावतीने स्पर्धकांकडून प्राप्त छायाचित्रे फेसबुकवर अपलोड करण्यात येणार असून जादा लाइक मिळवणार्या छायाचित्रांतील गौरी - गणपतीच्या भक्तांना विजेता ठरवण्यात येणार आहे.
सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. गौरींचीही प्रतिष्ठापणा बुधवार रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर राणा प्रतिष्ठाणने ही स्पर्धा आयोजित केली आहे. घरगुती गौरी - गणपती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या सजावटीचे छायाचित्र ranapratishthan@gmail.com या ई-मेल आयडीवर नाव, मोबाइल व पत्त्यासह पाठवणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे फेसबुकवर राणाजगजितसिंह पाटील (www.facebook.com/ranadadapatil) यांच्या पेजवर अपलोड केली जातील. ज्या छायाचित्राला अधिक लाइक मिळतील त्या छायाचित्र काढणार्या भक्तांना विजेता ठरवण्यात येणार आहे. मंडळ व घरगुती गणेशासाठी वेगळी पारितोषिके देण्यात येणार आहेत. बुधवारपासून ते 19 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत छायाचित्र स्वीकारली जाणार आहेत. या स्पर्धेचाचा निकाल पेजवर 20 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता घोषीत करण्यात येणार आहे. या स्पध्रेमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.