उमरगा - शहरातील पाचवर्षीय मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी महीला संघटनानी मूक मोर्चा काढून तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. तर अनेक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.
ज्या मुलीचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत. त्या चिमुकलीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार करून उमरगाकरांचे मन हेलावून टाकले आहे. आपल्या घरासमोर खेळत असलेल्या या पाच वर्षाच्या चिमुकलीस चॉकलेटचे आमिष दाखवून मोहसीन शेख नामक नराधमाने स्वत:च्या मोबाइलमधील चित्रफित पाहात अत्याचार केल्याचे कबूल केले आहे. मानवाला काळीमा फासणार्या घटना दिल्ली, मुंबईसारख्या शहरात घडत असताना, त्याची पुनरावृत्ती तालुक्यापर्यंत पोहोचली आहे. या दुष्ट लोकांचे एवढे मनोबल का वाढत आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. अशा लोकांना वेळीच कठोर शिक्षा देण्याची गरज आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी रोजी निघालेल्या मूक मोर्चात 'बप्पा आम्हाला माफ कर, आज आम्ही शरमिंदे आहोत' असे फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला. एका राक्षसी प्रवृत्तीमुळे संपूर्ण शहराला धक्का बसला आहे.
मंगळावार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघ व महिला राजसत्ता अंदोलनातील जवळपास शंभर महिलांनी तहसील कार्यालयावर लाल फिती बांधून मूक मोर्चा काढला. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनत म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्राला लाजवणारे व काळीमा फासणारे हे कृत्य झालेले आहे या घटनेचा खटला जलदगती न्यायालयामार्फत चालवण्यात यावा. तसेच देशभर बलात्काराचे प्रकार होत असतानाही शासन असे कृत्य करणाराविरोधात ठोस पावले उचलत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या मोर्चात डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष धीरज बेळंबकर, महिला राजसत्ता आंदोलनच्या अध्यक्षा विद्या वाघ, नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, अलका गुरव, मीनाक्षी दुबे, आशा गोरे, सीमा शेख, अहिल्या घोडके, सुनीता मोरे आदींसह महिला मोठय़ा संखेने उपस्थित होत्या. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्या वतीने साहाय्यक पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, तसेच घडलेल्या प्रकरणाची सक्षम पोलिस अधिकार्यांमार्फत तपास करावा. सदर आरोपीस बचावाची संधी मिळू नये, अन्यथा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर उप जिल्हा प्रमुख शकुतंला दुणगे, तालुका प्रमुख ज्योती माने, नगरसेविका सुनीता सगर, ज्योती चौगुले, मीना राऊत, सुभाबाई वाघमारे, संगीता गिरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.
मुस्लिम धर्मीयांच्या वतीने निंदा
शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना इस्लाम धर्माच्या विरोधी असून अशा प्रवृत्तीचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. घटनेतील गुन्हेगार मुस्लिम समाजाचा असला तरीही समाज अशा प्रवृत्तीला पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारास कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या निवेदनावर अजुंमन मुस्लिम कमेटी अध्यक्ष जकी काझी, नगरसेवक अतिक मुन्शी, ख्वाजा मुजावर, भैया शेख, युसूफ शेख, निजाम व्हंताळे आदींच्या सह्या आहेत.
'अंनिस'चे निवेदन
अंधर्शद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घटनेचा निषेध व्यक्त करीत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सगर, परिवर्तन युवा मंचचे अमोल पाटील, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
'रोटरी'कडून कारवाईची मागणी
रोटरी क्लब व व्यापारी महासंघाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस निरिक्षक सुनील नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, उपाध्यक्ष भागवत सोनवणे, सचिव हरिप्रसाद चांडक, रोटरीचे प्रा. रवी आंळगे, सचिव प्रा. डॉ. संजय अस्वले, नितीन होळे, संजय ढोणे, दिलिप पोतदार यांच्या सह्या आहेत.
भक्कम पुरावा मिळाला
आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपीच्या संपूर्ण वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आरोपीचे कपडे, मोबाइल व इतर पुरावे मिळाले आहेत. आणखीन पुराव्यात भर टाकण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे. असे पोलिस निरिक्षक सुनील नागरगोजे यांनी सांगीतले.