उस्मानाबाद : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जप्त करण्यात आलेली जेसीबी मशीन चोरुन नेल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा विद्यार्थी प्रदेश संघटक रोहन ऊर्फ (मुन्ना) रमेश खुने (वय २७) यास उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत उस्मानाबाद शहर पोलिसांनी सांगितले की, महिनाभरापुर्वी उस्मानाबाद येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातून जप्त करण्यात आलेली जेसीबी मशीन चोरीला गेल्याची घटना घडली होती. सदरील जेसीबी मशीन या कार्यालयातून बाहेर घेवून जाणा-या महादेव मुंडे यास पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक करुन या प्रकरणाचा तपास पुढे सुरु ठेवला होता. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिका-याचे नाव सांगून राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे असे म्हणून घेणा-या रोहन खुने याने या जेसीबी चोरी प्रकरणामध्ये सहभाग घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. उस्मानाबाद शहर पोलिसांनी आज दि.१४ सप्टेंबर रोजी रोहन ऊर्फ मुन्ना खुने (वय २७ रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद) याला अटक केलेली आहे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी आपले संबंध आहेत, मी पोलिस अधिका-यांच्या बदल्या करु शकतो, नवीन भरती प्रक्रियेमध्ये देखील मदत करतो असे सांगून अनेकांना आर्थिक गंडा घातल्याची माहिती तपासिक पोलिस अधिका-यांनी पत्रकारांना सांगितले. उस्मानाबाद पोलिसांनी अटक केल्यानंतर अटकेची कारवाई करणा-या पोलिस कर्मचारी आणि अधिका-यांना देखील खुने याने एकेरी आणि अरेरावीची भाषा वापरुन बघून घेण्याची धमकी दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांच्यासह पोनि. सुरेश घाडगे, पोउनि. भास्कर पुल्ली हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातून जेसीबी चोरुन नेणा-या प्रकाराला या कार्यालयातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचारी देखील जेसीबी चोरुन नेणा-या व्यक्ती प्रमाणेच दोषी आहेत.
या दोषीवर देखील पोलिसांनी आपला हात फिरवुन त्यांच्यावर ही कारवाई करावी अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भ्रष्ट आणि दलालांनी वेढलेल्या कार्यालयातलील कामकाजाला वैतागलेल्या नागरीकांनी केली आहे.