परळी : येथील वैद्यनाथ मंदिराजवळील हरिहर तीर्थात पाय घसरुन पडलेली महिला बुडत असताना तिला स्वत:चा जीव धोक्यात घालून सात चिमुकल्यांनी शनिवारी वाचवले.
      अंबिका गंगासागर तांबडे (वय ६५, रा. गंगासागर नगर, परळी) असे त्या वृध्देचे नाव आहे. तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंतेबाहेर आहे. दुपारी त्या वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी त्या तीर्थातील पाण्यात पडल्या. दीपक खाडे, कृष्णा पौळ, धोंडीराम चाटे, संग्राम पवार, विनायक कदम, अभिषेक कदम, स्वप्निल उगलमुगले हे जवळच खेळत होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अंबिकाबाईंना वाचवले. आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर, अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी मुलांचे कौतुक केले. वृध्द महिलेला वाचविणार्‍या सात मुलांचा आ. धनंजय मुंडे यांनी सत्कार केला.
 
Top