कुलधरा गाव |
कुलधरा (जि. पाली - राजस्थान) पालीवाल ब्राह्मनाचे एक गांव होते आणि एक दिवस अचानक येथे गुण्या गोविंदाने आणि दिवसा गणिक उन्नती आणि उत्कर्ष करणारे पालीवाल आपली सारी संपत्ती आणि स्थावर जंगम मालमत्ता सोडून निघून गेलेत... आणि त्या नंतर आज पर्यंत कुलधरासह त्या ८४ गावात कोणीही वास्तव्य करू शकले नाही.... अनेक वेळा अनेक जणांनी प्रयत्न करून बघितले पण येथे येवून कोणीच राहू शकले नाही .. कुलधराचे अवशेष आजही अनेक अवशेष संशोधक आणि और पुरातत्ववाद्यासाठी अभ्यासाचा आणि संशोधनाचा गहन विषय आहे ..... अनेक पैलूंनी पालीवाल ब्राह्मनानी कुलधरा सारख्या गावांना वैज्ञानिक आधारावर विकसित केले होते.....।
कुलधरा जैसलमेर पासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर आहे. असे म्हणतात कि, पालीवाल समुदायचे या भागात ८४ गाव होती आणि कुलधरा हे त्यातीलच एक महत्वाचे गाव होते. मेहनती, इमानदार आणि गडगंज संपत्ती असलेल्या पालीवाल ब्राम्हणांनी कुलधरा हे गाव सन 1291 मध्ये सुमारे सहाशे घर बांधून वसवले होते. ''पालीवाल'' हे आडनाव त्यांना ते राहत असलेल्या पाली या राजस्थानातील गावावरून पडले आहे..... पालीवाल ब्राम्हण असूनही खप कष्टाळू मेहनती आणि उद्यमी समुदाय होता. आपली बुद्धिमत्ता, कौशल्य आणि अपार परिश्रम करीत पालीवाल समुदायाने या भागातील वाळवंटावर सोने उगवले होते. आश्चर्याची गोष्ट आहे कि, पालीहून कुलधरा येथे येवून पालीवालांनी वाळवंटावर मधोमध या गावास वसवून शेती व्यवसायावर आधारित समाजाची परिकल्पना केली होती. वाळवांटात शेती हे पालीवालांच्या समृद्धिचे रहस्य होते. जिप्समच्या थराची जमीन ओळखून तेथे वास्तव्य करणे हे त्यांच्या दूरदृष्टी आणि वैज्ञानिक विचारांची परिपक्वता दर्शवते आणि त्यामुळेच त्यांच्या उन्नतीचे आणि गर्भश्रीमंतीतील प्रगतीचे गमक आहे. पालीवाल समुदाय मुख्यतः शेती, व्यापार, आणि पशुपालन करीत असे आणि आपले जीवन आनंदात आणि मोठ्या दिमाखात जगत असे.
पालीवाल समुदायाने भूपृष्ठावरील वाहणा-या किंवा जमिनीवरील पाण्याच्या स्त्रोताचा वापर न करता वाळवांटातील भूगर्भातील पाण्याचा वापर कार्य आपल शेती व्यवसाय फुलवला होता.पालीवाल समुदाय अशा जागीच गाव वसवत जेथे भू गर्भात जिप्समचे थर असत या मिगील वैज्ञानिक कारण असे कि, जिप्समचे थर पावसाचे पाणी जमिनीत शोषित होण्यापासून रोखते आणि याच पाण्याचा वापर ते शेतीसाठी करीत असत आणि थोडे थोडके नाही तर दरवर्षी भरघोस उत्पादन घेत असत. पालीवालंच्या याच जल-व्यवस्थापनाच्या दूर दृष्टीकोणामुळे ''थार'' चे वाळवांट हे मानवी लोकसंख्या तसेच पशुपक्षी यांनी फुललेले जगातील सगळ्यात मोठे आणि सधन वाळवंट बनवले होते. या सोबतच या भागातील पालीवालांनी असे तंत्रज्ञान विकसित केले होते कि ज्यामुळे पावसाचे पाणी रेताळ जमिनीत विरळुन न जाता एका विशिष्ठ पातळीला जावून जमा होत असे.
कुलधरा गावातील घरांच्या दारांना कुलूप नसायचे, गावाचे मुख्य-द्वार आणि घरांमध्ये विशिष्ठ अंतर असायचे परंतु या गावातील ध्वनीप्रणाली अशी असायचे कि मुख्यद्वारा पासूनच येणा-याच्या पावलांचा आवाज गावापर्यंत पोहचत असे. गावातील सर्व घरे एका विशिष्ठ प्रकारच्या खिडक्यांनी आप आपसात जोडलेली असायची जेणे करून घरांच्या रांगाच्या या टोक पासून त्या टोकापर्यंत संदेश पोहचवता येत असे. तसेच घरातील पाण्याचे कुंड माजघर आणि अंतरंगात जीने (पाय-या )अनोख्या वास्तू रचनेची नमुने असत. असे म्हणतात कि, पालीवाल समुदायास वैदिक तसेच आधुनिक वास्तू रचनेचे ज्ञान जन्मजातच असायचे हे त्यांच्या घरातील अंतर्गत वास्तू रचनेतून दिसायचे त्यांच्या घरातील अंतरगत रचना आणि घराचे निर्मिती अशा कोनात असे कि नैसर्गिक हाव हि खेळती असायची जेवे करून रखरखत्या वाळवंटातील उन्हाळ्यातही ही घरे वातुनुकुलीत असल्या सारखी असायची.
* परंतु असे उन्नत आणि विकसित गांव एके दिवशी अचानक खाली का आणि कसे झाले ?
इतिहासात अनेक दाखले (उदाहरण) मिळतात अनेक दाखले हे चिरंतर आठवणीत राहतात. कारण ती वेगळी आणि अदभूत आश्चर्यकारक असतात.... येथे असाच एक ऐतिहासिक अनोखा अदभूत दाखला आपणास पालीवालांचा बघावयास मिळतो.... हा दाखला... एका व्यक्तीचा नाही.... एका घराचा... एका परिवाराचा नाही ... एका गावचा ही नाही....तर हा दाखला आहे. ८४ गावांच्या हजारो लोकांचा आहे..... एकीकडे एका स्त्रीची अब्रू आणि दुसरीकडे हजारो लोक.....या सा-या गावातील हजारो पालीवाल ब्राम्हणांकडे वेळ होता तो फक्त एका रात्रीचा.....या एका रात्रीतच या सगळ्यांना निर्णय घ्यायचा होता तो...एक तर आपल्या एका मुलीचा सौदा करायचा कि...सगळ्यांना मिळणारी सजा भोगायचा......आणि सजा पण अशी कि ज्याने मानवी अंतःकरणाचा थरकाप उडावा... परंतु अशा थरकाप उडवणा-या आणि भयभीत अवस्थेतील पालीवाल ब्राम्हणांनी त्या काळी रात्री एक ऐतिहासिक आणि अनाकलनीय असा निर्णय घेतला... या सगळ्या गावातील पालीवाल ब्राम्हणांनी रातोरात गाव खाली करून... जे बलिदान दिले ते इतिहासात दुसरी कडे कुठेच बघावयास मिळत नाही... पालीवालांच्या उन्नती आणि उत्कार्ष्याला कुलधरा-जैसलमेरचा दिवाण असलेल्या सालम सिंहची दृष्टी लागली होती.... सालम सिंह हा एक अय्याश आणि क्रूरकर्मा दिवान होता... तो जरी एक सामान्य दिवान असला तरी त्याला त्या राज्याच्या राज्याचा वरदहस्त प्राप्त होता. गावातील सर्व कर वसूल करून तो त्यावर अयाशी करत असे तसेच गावातील लेकी-सुनांचे अपहरण करून आपली हवस भागवणे हे त्याचे नित्याचेच काम होते. या सालीम सिंग ची नजर एकदा एका पालीवाल ब्राम्हणाच्या मुलीवर पडली. या मुलीला पाहताच तो इतका उतावळा झाला कि त्याच्यातील पाशवी राक्षस जागा झाला आणि तो आपली शाररिक भूक शमवण्यासाठी तिला प्राप्त करण्यास इच्छुक होता आणि त्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्यास तयार होता. त्याने त्यासाठी पालीवालांवर दबाव आणण्यास आणि त्यांचा छळ करण्यास सुरुवात केली. पालीवाल आपल्या मागणीस तयार नाहीत हे कळल्यावर त्यांने पालीवाल ब्राम्हणांवर मनमानी करण्यास सुरुवात केली. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या पालीवालांवर त्याने झीझीया कर लावण्यास सुरुवात केली. अव्वाच्या सव्वा कर आकारणी करूनही पालीवाल आपल्या समोर झुकत नसल्याचे बघून त्याने पालीवालांना अंतिम निर्वाणीचा इशारा दिला आणि त्या मुलीचा घरी त्याने निरोप पाठवला जर येणा-या पौर्णिमेपर्यंत जर ती मुलगी त्याच्या शयनगृहात नाही पाठविली गेली तर तो या गावावर आक्रमण करून संपूर्ण गाव नेस्तनाबूत करेल आणि त्या मुलीस पळवून नेइल. गावातील ब्राम्हणांनी त्याच्या या धमकीला गांभीर्याने घेतले आणि त्याच्या वेळेच्या मर्यादेकडे लक्ष न देता त्याने दिलेल्या धमकीवर उपाय शोधण्यासाठी सगळ्या ८४ गावातील पालीवाल ब्राम्हणांनी आपल्या कुलदेवतेच्या मंदिरासमोर बैठक घेतली. सगळ्या ८४ गावातील पालीवाल ब्राम्हणांनी पंचायतसमोर एक मुखाने एक दिलाने निर्णय घेतला. काही जरी झाला तरी आपली मुलगी त्या दिवाणाला नाही द्यायची. गरज पडल्यास आपण गाव सोडून जाण्यास तयार आहोत, असे ठामपणे ठरवले. अन्याय अत्याचारापुढे न झुकण्याची गाठ पाठीशी बांधू हजारो पालीवाल्लांनी हा निर्णय घेतला. पालीवाल ब्राम्हणांच्या अस्मितेला स्वाभिमानाला आणि अब्रूला ठेच पोहचवणा-या पुढे न झुकता पालीवालांच्या एक वर्ण संकर संतान संस्कृतीला जपण्याचा निर्णय घेतला आणि पौर्णिमेच्या रात्रीच या ८४ गावातील हजारो पालीवालांनी फक्त आपल्या अंगावरील वस्त्रांसाहित हि ८४ गावे खाली केली. आपली सारी स्थावर जंगम मालमत्ता, पैसा अडका, सोने नाणे सा-यांचा त्याग करत या गावातून त्यांनी रातोरात काढता पाय घेतला आणि जाता जाता एक शाप पण या गाव्वांना दिला कि '' या गावात कधीच वस्ती होणार नाही या गावातील घरांमध्ये कधीच कोणी राहू शकणार नाही. तसेच आम्ही पालीवाल पुन्हा कधीच या गावत परत येणार नाही ''
कालांतराने अनेक लोकांनी आणि सरकारनेही या गावांना पुन्हा ऊर्जित अवस्था देण्याचा प्रयत्न केला. परंतु आजपर्यंत त्यांना यात यश आलेला नाही. असे म्हटले जाते कि, जो कोणी या घरात राहण्याचा प्रयत्न करतो तो देशोधडीला लागतो किंवा त्यात त्याचा मृत्यू तरी होतो. सरकारचा आणि अनेक लोकांचा ही गावे वसवण्याचा प्रयत्न तर सफल नाही झाला आणि भविष्यात कधी होईल असेही वाटत नाही म्हणूनच कि काय सरकार ने या सर्व गावांची घेरा बंदी करून त्यांना कुंपणाने बंदिस्त करून ठेवले आहे आणि या गावांच्या मुख्य-द्वारा वर एक चौकीदार पहारेकरी म्हणून ठेवला आहे. हि सगळी गावे त्या रात्री नंतर कधीच उत्कर्ष पावली नाहीत कधीच वसली नाहीत आणि भविष्यात कधीच होणार हि नाहीत परंतु या विश्शिन्न अवस्थेत ही पर्यटकांच्या खिश्यातून पैसे काढून सरकारची झोळी भरीत आहेत.... आपल्या घरातील लेकी-सुनांना साठी या दगडांच्या घरात राहणा-यांनी जे बलिदान दिले आहे ते भविष्यात कोणीच देवू शकत नाही. हे दगड विखुरले जरी असले तरी तुटले नाहीत.
काही काळापूर्वी विदेशी पर्यटक येथे या लालसेने येत होते कि, पालीवाल ब्राम्हणांची जी अपार संपत्ती येथे दडलेली आहे ती त्यांना मिळेल आणि या लालसे पोटीच त्यांनी अनेक ठिकाणी खोद काम करून ठेवेले आहेत. आजही कुलधरा गावात अनेक ठिकाणी खोदकाम केल्याचे दिसून येते. या शिवाय आजही कधी चोरट्या मार्गाने तर कधी खुले आम येथील दगड-विटा काढून इतरत्र त्यांचा वापर बांधकामात करण्यात येत आहे.
अश्या भग्नावस्थेतील गावे बघून मन विश्शिन्न तर होतेच पण एक अनामिक भीती आणि चिंताही मनात घर करून राहिली आहे कि, एका समुदायाचा एका संस्कृतीचा जाज्वल्याचा आणि त्यागाचा इतिहास काळाच्या पडद्या आड तर होणार नाही...? येणारी पिढी या त्यागाची माती कधी समजू शकेल कि नाही ?आपल्या इतिहास बद्दल आणि संस्कृती बद्दल उदासीन असलेल्या सरकार ला या ८४ गावांचे नियोजन बद्ध पद्धतीने जतन करून भारतीय पुरातत्व वारसाचा दर्जा दिल्यास एका इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास आगामी पिढीला नक्कीच करता येईल...नाहीतर ....पालीवालांचे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक रहस्य कुलधरा च्या अवशेषांमधेच विरून जातील.

अजय पालिवाल
जळगाव