नळदुर्ग -    जिल्‍हास्‍तरीय  शालेय एअर रायफल शुटींग स्‍पर्धेत यमगरवाडी ता. तुळजापूर येथिल विद्यार्थ्‍यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.   एकलव्‍य आश्रमशाळेचे (यमगरवाडी) विद्यार्थ्‍यांनी दि. 13 डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी स्‍टेडीयम उस्‍मानाबाद येथे जिल्‍हास्‍तरीय शालेय  एअर रायफल शुटींग स्‍पर्धेत यश मिळविलयाने त्‍यांची  विभागीयस्‍तरील स्‍पर्धेसाठी  निवड करण्‍यात  आल्‍याचे उमाकांत मिटकर यांनी सांगितले .
             या स्‍पर्धा  14 , 17, 19  वयोगटाच्‍या मुला-मुलीमध्‍ये  झाले आहे . यामध्‍ये    रितेश दिनकर ठोंगे , शरद पवार हायस्‍कूल उस्‍मानाबाद (प्रथम), बालाजी प्रताप रंदवे , एकलव्‍य प्रा. आश्रमशाळा मंगरूळ (द्वितिय) , अर्जून समशेर राठोड . पदमसिं‍ह पाटील माध्‍यमिक वि. चिंचोली (प्रथम )    विवेक गणेश जळके भोसले हायस्‍कुल उस्‍मानाबाद (द्वितिय) ,    विक्रम मनोहर निंबाळकर ,पदमसिह पाटील माध्‍यमीक वि. चिंचोली (प्रथम)     सुषिमता महादेव शेंडगे, जि.प.प्रशाला मंगरूळ  (द्वितिय)      कु. सावित्री  शंकर बंडगर . पदमसिंह पाटील माध्‍यमिक  शाळा चिंचाली (प्रथम)     ,शितल दिपक यमगर – यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालय तुळजापूर , या स्‍पर्धेत एकलव्‍य आश्रमशाळेनी (यमगरवाडी) आघाडी घेतली. या विदयार्थांना गणेश जळके, बनकर अशोक, ,  राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले . मुख्‍याध्‍यापक  विठठल मेत्रे  संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुवर्णा रावळ उपाध्‍यक्ष   अभय शाहपूरकर, महादेव  गायकवाड, रावसाहेब कुलकर्णी ,नरसिंग झरे ,गिरीश कुलकर्णी ,चंद्रकांत गडेकर .मदन कुलकर्णी यासह  सर्व पदाधिकारी व शिक्षकांनी यशस्‍वी खेळाडुचे अभिनंदन करून पुढील स्‍पर्धेस सुभेच्‍छा दिले.                        
 
Top