नळदुर्ग  -येथिल   परिवर्तन सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने   विविध क्षेत्रातील उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍या मान्‍यवराना राज्‍यास्‍तरीय पुरस्‍कारने गौरविण्‍यात येणार आहे.विविध क्षेत्रात काम करणा-या मान्‍यवरांकडून पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव  मागविण्‍यात  येत आहे. राज्‍यस्‍तरीय परिवर्तन पुरस्‍कार कला,  साहित्‍य, क्रिडा, समाज सेवा, पत्रकरिता, शिक्षण मित्र, गुणवंत कामगार, शेती मित्र, उदयेगता आदि   क्षेत्रातील व्‍यक्‍तींना पुरस्‍कार देण्‍यात येणार आहे. तरी इच्‍छुकांनी आपले प्रस्‍ताव दि.  15 ऑक्‍टोबर  पर्यंत सचिव परिवर्तन सामाजिक  संस्‍थेकडे  संबंधितानी  अर्ज फोटो, बायोडाटा व कामासंबंधीची  सविस्‍तर माहितीचे  प्रस्‍ताव पाठविण्‍याचे   अवाहन  संस्‍थेचे  सचिव मारूती बनससोडे यांनी केले आहे.
 परिवर्तन सामाजिक  संस्‍था ही  गेली 17 वर्षे ग्रामीण  व शहरी भागात कार्यरत  असून महिला संघटन, बचत गट निर्मिती प्रशिक्षण, वसूधा पाणलोट व्‍यवस्‍थापन, जलस्‍वराज्‍य प्रकल्‍प, पोतराज पूनवर्सन प्रकल्‍प, अंधश्रदधा निर्मुलन, ग्राहक जाणिव जागृती , पंचयातराज, कायदा साक्षरता, व्‍यवसाय प्रशिक्षण, निरंतर  शिक्षण, किशोरी विकास प्रकल्‍प, बालकामगार विरोधी जनजागृती ,  पर्यावरण जनजागृती  इत्‍यादी क्षेत्रात कार्यरत  असून अशा प्रकारचे काम करणा-या, महाराष्‍ट्रातील विविध क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविणा-या  मान्‍यवरांना दरवर्षी परिवर्तन सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने पुरस्‍कार देवुन ,   त्‍यांच्‍या कामाची ओळख इतरांना होण्‍यासाठी व त्‍यांच्‍या कामाबददल कृतज्ञता  व्‍यक्‍त करण्‍यासाठी  हा राज्‍यस्‍तरीय परिवर्तन पुरस्‍कार देण्‍यात येतो .
          
 
Top