उस्‍मानाबाद - शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध विकास व मस्त्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
बालाघाट शिक्षण संस्था, नळदूर्ग संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय,तुळजापूर यांच्या मार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औंरगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना कार्यशाळेचे उदघाटन .चव्हाण यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्राचार्य डॉ.जे.एस.मोहिते, श्रीमती डॉ.एस.के.स्वामी, डॉ. शरद गवांडे,डॉ.आर.एन.करपे, डॉ.एस.एल.कोरेकर, डॉ.अनिल शिंगे व एल.टी.कोरेकर आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वेगवेगळया गावामध्ये समाजासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधेची कामे उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. या कार्याबरोबरच शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेला माहिती करुन देऊन या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी करावे. शासन त्यांच्या पाठीशी सदैव असेल,असे सांगितले. खेडयापाडयात या सेवा योजना कार्यकर्त्यांनी तेथील नागरिकांबरोबर राहून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर कार्य केल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असेही सांगितले. या विद्यालयातील अनेक विद्यार्थी उत्तम रित्या घडले असून ते सध्या वेगवेगळया क्षेत्रात काम करीत असून उद्याचे उत्तम नागरिक घडविण्याचे कार्य होत आहे,असेही त्यांनी सांगितले.

   याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक श्रीमती डॉ.एस.के.स्वामी यांनी या योजनेमार्फत होत असलेल्या व राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. 
 
Top