बार्शी -: प्रा. विलास गोविंद जगदाळे यांना शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ते सौ.केशरबाई लिंबराज पडवळ उच्च माध्यमिक विद्यालय उपळे (मा.) येथील शिक्षक आहेत.
    मुळचे पांगरी ता. बार्शी येथील असलेल्या जगदाळे यांनी उपळे (मा.) येथे ३२ वर्षे शिक्षणाचे धडे देत विविध सामाजिक संस्थांच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला. संत वाड:मयाचा प्रचार आणि प्रसार, समाज साक्षरता व प्रबोधनातून त्यांनी वारकरी सांप्रदायाचा ध्वज फडकत ठेवला. विविध शाळांतच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रबोधनपर व्याख्याने देत अनेक गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम केले.
 
Top